Sunday, April 27, 2008

लक्ष पक्षांचे थवे

चवळीची शेंग पिवळी धम्मक अशी झळकते
तिपीतिपी ऊन, श्रावणाचे गान कंठात झुलते
पाऊल पाऊल उचलता काच बिंदोली सांडते
उभ्या बंधाऱयाच्या मनाला काहीसे वाटूनही जाते
सावळ्या मेघांचे आभाळात बन मन वेटाळते
तिला कुठलीशी जुनी आठ्वण पांघरुन जाते
गोबऱ्या गालाची मजूळ बोलाची अश्शी हरखते
तिच्या निळ्याभोर अश्राप डोळ्यांना पाखरु वेढते!

Thursday, March 27, 2008

ग्रेस

असतील लाख कृष्ण
कलिन्दिच्या तटाला
राधेस जो मिळाला
तो एकटाच उरला !

जरा अस्मान झुकले -- ना. धो. महानोर

ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !