सूर्यनारायणा नित नेमाने उगवा
अंधाराच्या दारी थोड़ा उजेड पाठवा !
मोडक्या घराच्या बिंद्रावनाशी सांजेला
दिव्याचा आधार जड़ो त्याच्या संसाराला !
ओन्जळीन भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सवली मायेची !
आबादानी होवो शीत भरू दे दाण्याचे
तुझ्या पलखिला शब्द बांधू तुकोबाचे !
Thursday, June 26, 2008
Tuesday, June 17, 2008
तीर्थाटन मी करित पोचलो ...
तीर्थाटन मी करित पोचलो
नकळत शेवट तव दारी
अन तुझिया देहात गवसली
सखये मज तीर्थे सारी
अधरावरती तव वृन्दावन
प्रयाग सापडले नेत्री
भालावरती ते मानससर
मानेवरती गंगोत्री
गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवती भवती
मोक्षाची ही नुरली इच्छा
नको कृपा त्याहून दूसरी
तीर्थाटन मी करित पोचलो
नकळत शेवट तव दारी
Subscribe to:
Posts (Atom)