तीर्थाटन मी करित पोचलो
नकळत शेवट तव दारी
अन तुझिया देहात गवसली
सखये मज तीर्थे सारी
अधरावरती तव वृन्दावन
प्रयाग सापडले नेत्री
भालावरती ते मानससर
मानेवरती गंगोत्री
गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवती भवती
मोक्षाची ही नुरली इच्छा
नको कृपा त्याहून दूसरी
तीर्थाटन मी करित पोचलो
नकळत शेवट तव दारी
6 comments:
hay,
it indeed is a good thing that you are compiling online the poems you like. I think you should mention poets' names with the poems; you know, "credit is due he.." and rest of the blah-blah-blah...
btw, i am a regular reader of your other blogs too. You write really well, but I think your writing has become a bit monotonous in the recent past. Anyhow, I am sure you will find your stride again (or equally good: I will fall-in with your stride, and will find that I was wrong :)
ATB & KIU
bipin.
@ Bipin..
Thanks..I will try to get my stride back. :)
सई
तूझ्या पाठांतराच कौतूक वाट्त!
हि कविता किती लहानपणी येत होती तूला!
खर तर त्या वेळी तू हि कविता समजण्याच्या वयात पण नव्ह्तीस!
आता प्रितरंग मधल्या इतर कविता पण लिही इथे!
@ baba..yes..that is my plan..I want to get all the poems out of my head so that I have my disk free for more. :)
Hey, good to see to your blog! You can do one thing though. Please write the name of original poet. This poem is by Vinda. If you don't remember the poet, u can mention so, I am sure people will help with their memories!
विंदा करंदीकर यांची नितांत सुंदर कविता आहे ही.
मानव्याचा व गुणदोषांसहित माणूस असण्याचा उच्चरवाने उच्चार करणारी, खुल्या दिलाने माणूसपणाचा स्वीकार करत, स्त्रीदेहाचे लोभस रूप तीर्थाटनापेक्षा ही मंगल आणि उदात्त असल्याची जाणीव करून देणारी रचना...
सगळी तीर्थ आणि क्षेत्र केवळ स्त्रीदेह आतच सामावलेली आहेत असा हा साक्षात्कार आहे
Post a Comment