ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले
अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
जरा अस्मान झूकल...
मला परत "प्रित रंगी" दिवसांची आठवण झाली.
आपण सगळे किती वेळा ऎकत असू ना ही गाणी?
मला आत्ताही अस वाटतय कि तूच ही कविता चालीत,तालासूरात म्हणते आहेस.सई तू किती लहान होतीस तेव्हा! एवढ्या लहान वयात तूझ्या या सगळ्या कविता कशा आवडायच्या याच मला नेहमी कौतूक मिश्रित आश्चर्य वाटायच.अजूनही वाटत. महानोरांच्या कविता मोहात पाडणारया आहेत.अस्सल मातीतल्या कविता आहेत त्यांच्या.
कविता करुण रसातील असो वा श्र्रुंगार रसातील असो त्यांचे शब्द मात्र अस्सल मातीतीलच असतात.
त्यांच्या कवितांना चाली लावण हे देखील अवघड काम आहे.ह्रूदयनाथ (जैत रे जैत ) किंवा आंनंद मोड्क(एक होता विदूषक) य़ांच्या सारख्या प्रतिभावंताचच ते काम आहे.
मराठी कविता समृध्द करण्यात महानोरांचा वाटा मोठा आहे.
याच बरोबर तूझ्या रसिकतेला दाद्च द्यावी लागेल
Post a Comment