Tuesday, February 9, 2010

ग्रेस

--------------------------------------
स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
---------------------------------------
दीप पाजळले नेत्री
गात्री सजविली शेज
रंग वादळासारखे
आले भरून क्षितीज!
माझा आंधळा प्रपंच
झाडे श्रावणासारखी
अशा सांजवेळी आली
मला न्यावया पालखी
पुसा बाहुलीचे डोळे
वेचा आभाळात मोती
कुण्या पायांच्या नादाने
दिशा कोसळून जाती
करा अंगण मोकळे
त्यात विझू नये दिवा
एका झुळुकीने माझा
जन्म मातीत मिळावा!
-------------------
ही माझी प्रीत निराळी
संध्येचे श्यामल पाणी
दु:खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी
हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतिरंगातील नि:संग
शपथेवर मज आवडती
गायीचे डोळे व्याकुळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ
आकाश भाकिते माझी
नक्षत्र कूळही दंग
देठास तोडतानाही
रडले न फुलाचे अंग!
समईचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळ वारा
देहाची वितळण साधी
सोन्याहून लख्ख शहारा
तू खिन्न कशाने होशी?
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला
कधी दुखविल का वनमाळी?
------------------------
नंदनवनातल्या आदिमानवाची ही आर्त कहाणी
फक्त एका ज्ञानवृक्षाचे फळ चाखू नका
एवढाच तर परमेश्वरी आदेश होता !
आदियुगुलाने तो शिरोधार्यही मानून घेतला होता
पण त्यांच्या सुखाच्या मुळावर भिंगरीसारखा चालून आला
पाताळातील एक सूडदार नाग..
आदिमायेवर मोहपाशाचे जाळे विणायला सुरवात केली त्याने
आदिमाय भुलली, त्या निषिद्ध फळाचा मोह अनावर झाला तिला
आणि भिंगरीच्या करवती टोकाचे काम साधून गेले
चक्रगती ओलांडल्यानंतर भिंगरी भोवंडून गेली
पण आदिमायेच्या गर्भावर जन्मवेणांचे कराल शाप रेखून गेली
ही आदिमाय मला फार फार आवडते !
नंदनवनाचाही विसर पडावा एवढी भूल केली निर्धास्तपणे तिने
आणि त्या शोकावर्तात आदिपित्यालाही फरफटत नेले!
त्याला एकट्यालाच नव्हे, तर अख्ख्या मानवी अस्तित्वालाच
ही दैवी चूक दोघांनीही केली असली तरी
त्यातील आदिपिता हे निमित्त कारण
आणि आदिमाता हेच आदी कारण आणि आदिसूत्रही
बायबलमधील ही विश्वमाता रुचते मला ते आध्यात्मिक कारणांसाठी नव्हे
तर मला आवडते तिची आत्मबलिदानाची रीत
चूक करण्याचे अटळ प्राक्तन पचवून तिने निषिद्ध फळ चाखले
आणि वासनेला जन्म दिला! वासना हा एक चक्रव्यूह आहे
आदिमातेने आपल्या मागे कितीही शाप लावले असले तरी
तिनेच हा दिव्य चक्रव्यूह आपल्याला दाखवून दिला
आणि दैवी करुणेपेक्षाही आकर्षक अशा मूलभूत देवत्वाकडे नेणारी वाट
भिंगरीसारखी आपल्या अस्तित्वावर सोडून दिली
हेच तिचे अनंत न फिटणारे उपकार!
मानवी भूलभिंगर्‍यांच्या जगड्व्याळ रचनाचक्राच्या केंद्रस्थानी
ती आजही रत्नासारखी लखलखते तिच्या विराट बलिदानामुळेच
म्हणून तिच्यासाठी हा नव्या प्रार्थनेचा हुंकार

हे आदिमाये
"मंद टाक पाउले नि शीळ घाल लीलया
चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या"
-------------------------------
Thinking of putting all my favorite Grace poems up. Now that I have them all. :)
Cheers
Saee

5 comments:

Gayatri said...

:) वा! मला मेजवानी.

Bipin said...

class!!!
dhanyavaad!

Mandar Gadre said...

Thankyouu!!
:)

Dk said...

:D :D :D

Unknown said...

manik buvanchee parvangee adheech ghetalee tar bare.